आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Prepaid Mobile धारकांची वर्षभरात पडताळणी करा, आधारशी जोडा -सुप्रीम कोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरातील ९५ कोटी प्रीपेड मोबाइलधारकांना नव्याने ओळख पटवून द्यावी लागेल. बनावट ओळखपत्रावर सुरू ५ कोटींहून अधिक प्रीपेड मोबाइल क्रमांकांच्या पडताळणीसाठी  असे केले जात आहे. यादरम्यान जास्तीत जास्त मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी जोडले जातील. 

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला हा आदेश दिला. सरन्यायाधीश जे. एस. खेहर व न्या. एन. व्ही. रमणा यांनी ही पडताळणीची प्रक्रिया वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी पडताळणीची योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रारंभिक योजनेनुसार मोबाइल रिचार्ज करणारांमार्फत पडताळणी फॉर्म भरून घेऊन ओळखपत्र घेतले जाईल. ओळखपत्रासाठी आधार कार्डला प्राधान्य असेल. पडताळणी फॉर्म न भरल्यास मोबाइल क्रमांक बंद होईल. लोकनीती फाउंडेशनने यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.
 
- मी खऱ्या ओळखपत्रावर सिमकार्ड घेतले. मग माझी पडताळणी पुन्हा का?
फेब्रुवारी २०१६ पर्यंत देशात एकूण १०५ कोटी मोबाइलधारक होते. त्यात ९०% प्रीपेड क्रमांक आहेत. सुमारे ५ कोटी क्रमांक बनावट ओळखपत्रावर आहेत. बँकिंगसह अनेक कामांसाठी मोबाइल क्रमांकाचा वापर होऊ लागला आहे. बनाववट आयडीवर कोणीही गुन्हा करून वाचू शकतो. त्यांची छाननी करण्यासाठी नव्याने पडताळणी होईल.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या आधारे जाणून घ्या, तुमच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...