आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती निवडणूक : भाजपला विजयाची खात्री, सव्वा लाखाहून अधिक मते मिळण्याची अपेक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपला विजयाची खात्री पटली आहे. उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर भाजपला त्यांच्या पसंतीचा उमेदवार निवडून येण्याची केवळ खात्रीच नव्हे तर सव्वा लाखाहून अधिक मतांनी तो विजयी होईल, अशी अपेक्षा आहे. पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळात बदल करण्याची घाईही नाही. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी आम्हाला ६५ हजार मतांची गरज होती. त्या निवडणुकीनंतर केवळ १८ हजार मतांची गरज होती. दक्षिणेकडील राज्यांचे गणित पाहिले तर १८ हजार मतांची बेगमी तेथूनच पूर्ण होईल. याशिवाय गोवा तसेच पूर्वोत्तर काही राज्यांत आम्ही सत्तेवर आहोत. त्यामुळे अडचण निर्माण होणार नाही. आम्ही सव्वा लाखाहून अधिक मतांनी विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षात क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता अन्य वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे.
 
मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता एका पदाधिकाऱ्याने बाेलून दाखवली. परंतु जुलैनंतर बदल होईल. कृषी, ग्रामीण विकास, सामाजिक न्याय खात्याची कामगिरी समाधानकारक नसली तरी कामाचा वेग चांगला आहे.
बातम्या आणखी आहेत...