आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघड्यावर लघवी करण्यास अडवल्याने रिक्षाचालकाची हत्या, पंतप्रधानांकडून कारवाईचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली  - उघड्यावर लघवी करण्यास अडवल्याने एका ई-रिक्षाचालकाला मारहाण करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेवर जगभरातून टीका केली जात आहे. विदेश भेटीवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध करत दोषींना अटक करून कारवाईचे आदेश दिले आहेत. 
 
रवींद्रकुमार नामक ई-रिक्षाचालकाने गुरू तेगबहादूर मेट्रो स्टेशनजवळ दोन युवकांना उघड्यावर लघवी करण्यापासून अडवले. त्या ठिकाणी रिक्षाचालक बसून जेवतात, असे रवींद्रकुमारचे म्हणणे हाेते. दरम्यान, युवक पाहून घेण्याची धमकी देऊन गेले आणि नंतर थोड्या वेळाने सुमारे १२-१३ लोकांसह आले. रवींद्रला बेदम मारहाण केली. रवींद्रला नंतर हिंदुराव रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिस सध्या सीसीटीव्ही फुटेज पाहत असून दोन्ही युवक दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे म्हटले जाते.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...