आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांच्या पदवीचा वाद; रेकाॅर्ड तपासणीस सीआयसीची परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -  १९७८ मध्ये बीए उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासण्याची परवानगी देण्याचे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) दिल्ली विद्यापीठाला दिले आहेत. 
पंतप्रधान मोदी यांनी संबंधित वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे संबंधित विद्यापीठाचे म्हणणे आहे. विद्यापीठाच्या माहिती अधिकाऱ्याने माहिती देण्याचे नाकारताना अर्जाची गुणवत्ता व वैधतेवर प्रश्न उपस्थित केला होता.

१९७८ मध्ये कला शाखेच्या पदवी परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांची नावे, त्यांच्या वडिलांची नावे, रोल नंबर, गुणपत्रकासंबंधितच्या माहितीचा दस्तऐवज उपलब्ध करून देण्याचे निर्देश विद्यापीठाला देण्यात आले आहेत. 

संबंधित कागदपत्रांच्या सत्यप्रती मोफत उपलब्ध देण्याचेही आदेश बजावले आहेत.
आरटीआय अर्जदार नीरज यांनी विद्यापीठाकडे केलेल्या  अर्जात १९७८ मध्ये बीए परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची पूर्ण नावे, रोल नंबर, गुण तसेच उत्तीर्ण / अणुत्तीर्ण निकाल देण्याची मागणी केली होती. विद्यापीठाच्या माहिती अधिकाऱ्याने ही विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती असून त्याचा सार्वजनिक हिताशी संबंध नसल्याचे कारण देत माहितीस नकार दिला होता.