आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंपाकाच्या गॅससाठी 30,000 कोटींची गुंतवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली  - स्वयंपाक गॅसचे उत्पादन वाढवण्यासाठी तसेच डिस्ट्रिब्युशन नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी सरकार तीन वर्षांत ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. स्वयंपाकाच्या गॅसची विक्री दहा अंकांनी वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या भारतात जेवढी मागणी आहे, त्यातील अर्ध्या गॅसची आयात करावी लागते. ही आयात कमी करण्यासाठी २५ ते ३० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना बनवण्यात आली आहे. या माध्यमातून एलपीजी पाइपलाइन टाकणे, बॉटलिंग प्रकल्पाच्या क्षमतेचा विस्तार करण्यात येणार असून आयातदेखील वाढवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त १० हजार नवीन डिस्ट्रिब्युटर जोडण्यात येणार आहेत.  
 
पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले की, २०१६-१७ मध्ये स्वयंपाकाच्या गॅसचे ३.४५ कोटी कनेक्शन देण्यात आले. यात २.२ कोटी उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या मोफत कनेक्शनचाही समावेश आहे. गेल्या तीन वर्षांत एकूण सहा कोटी कनेक्शन देण्यात आले आहेत.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...