नवी दिल्ली -किमती कमी झाल्यानंतर निर्माण झालेल्या स्टेंटच्या तुटवड्याशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने आणीबाणीच्या धर्तीवर तत्काळ निर्मिती उत्पादन तरतूद लागू केली आहे. याअंतर्गत कंपन्यांसाठी स्टेंटचे पर्यायी उत्पादन आणि पुरवठा करणे अनिवार्य केले गेले आहे. कंपन्यांना दर आठवड्याला याचा अहवाल द्यावा लागेल. की त्यांच्या येथे किती स्टेंट तयार होताहेत आणि किती स्टेंट वितरित केले गेले आहेत.
फार्मास्युटिकल्स विभागाने स्टेंट उत्पादकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, रुग्णालये व बाजारात कोरोनरी स्टेंटची टंचाई होत आहे. पुरवठा सामान्य करण्याच्या सर्व पर्यायांवर विचारानंतर औषध मूल्य नियंत्रण कायद्याचे कलम ३ (१) लागू केले गेले आहे. याअंतर्गत आणीबाणीच्या स्थितीत सरकार कोणत्याही निर्मात्याला आपले उत्पादन वाढविणे आणि रुग्णालये, संस्थांना उत्पादन विक्रीचे निर्देश देऊ शकते.