आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य अकादमी: लेखकांमध्ये मतभेद, परत केलेले पुरस्कार लेखक 'परत' घेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर / नवी दिल्ली- असहिष्णुतेच्या मुद्द्यावर साहित्य अकादमी पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. नयनतारा सहगल यांच्यासह काही लेखक आपले पुरस्कार वापस घेण्यास तयार झाले आहेत, असा दावा साहित्य अकादमीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नाराज लेखकांना जणू उपरती होत असावी, असे दिसते.
जयपूरमध्ये साहित्यिक नंद भारद्वाज यांनी या बातमीस दुजोरा दिला आहे. परंतु पुरस्कार परत करणाऱ्यांमधील ४० लेखकांमधील १० जणांनी परत केलेले पुरस्कार वापस घेण्याची तयारी दर्शवली आहे. काही लेखक अजुनही पुरस्कार घेण्यास तयार नाहीत. दिल्लीत साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी म्हणाले, साहित्य अकादमीने लेखकांना पुरस्कार पुन्हा पाठवण्यास सुरुवात केली आहे. नयनतारा सहगल यांना हा पुरस्कार पाठवण्यात आला आहे. एक अन्य लेखक नंद भारद्वाजदेखील पुरस्कार वापस घेण्यासाठी तयार आहेत. परत केलेल्या इतर लेखकांनाही पुरस्कार पाठवले जाणार आहेत. दुसरीकडे जयपूर साहित्य संमेलनात भारद्वाज म्हणाले, गेल्या काही दिवसांत देशात असहिष्णुतेचे वातावरण होते. एक लेख एमएम कलबुर्गी यांची हत्याही झाली होती. साहित्य अकादमीने या प्रकरणी मौन धारण केले होते. त्यामुळेच मी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला होता. परंतु आता अकादमीने लेखकांचा सन्मान कायम ठेवला जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे मी पुरस्कार वापस घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अरुंधती यांच्याविरोधातील अवमान याचिकेवरील स्थगितीस कोर्टाचा नकार
नवी दिल्‍ली-
प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्याविरोधातील मुंबई उच्च न्यायालयाच्या अवमान याचिकेला स्थगिती देण्‍यास शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. अरुंधती यांनी एका नियतकालिकात प्रकाशित लेखात दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर जीएन साईबाबा यांचा जामीन अर्जाला फेटाळल्याच्या प्रकरणात प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहण्याची परवानगीदेखील सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. अरुंधती यांना २५ जानेवारी रोजी नागपूर पीठासमक्ष हजर व्हावे लागणार आहे. न्यायमूर्ती जे.एस. खेहर आणि न्यायमूर्ती सी. नगप्पन यांचे पीठ म्हणाले, कोर्टासमोर हजर राहण्यासाठी तुम्हाला मनात भय नसायला हवे. तुम्ही कोर्टात हजर व्हा. आम्हीच प्रक्रिया तयार केली आहे. आमचे लक्ष आहे. अरुंधती यांचे वकील चंदर उदर सिंह यांनी सोमवारच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची सूट देण्याची विनंती केली. परंतु आम्ही तुम्हाला सूट देऊ इच्छित नाहीत किंवा मनाईदेखील करत नाहीत, असे कोर्टाने म्हटले. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने २३ डिसेंबर २०१५ रोजी अवमान नोटीस जारी केली होती. गडचिरोली पोलिसांनी २०१४ मध्ये नक्षलींशी कथित संबंध असल्यावरून साईबाबास अटक केली होती.

अकादमीकडून पुरस्कार वापस करण्याची प्रक्रिया सुरू
साहित्यअकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी म्हणाले, अकादमी पुरस्कारासह ऑक्टोबरच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावाची प्रत सर्वांना पाठवली जाणार आहे. त्यानुसार अकादमीच्या घटनेत पुरस्कार परत करण्याची कोणतीही तरतूद नाही. दरम्यान, बिहार निवडणुकीपूर्वी साहित्य अकादमीकडे ४० हून अधिक लेखकांनी पुरस्कार परत केले होते. संस्कृती मंत्रालयाच्या सूत्रानुसार १० लेखकांना ते पुन्हा परत पाठवण्यात आले आहे.