आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राधे माँसाठी ठाणेदाराने सोडली खुर्ची; ठाणेदारासह 6 पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पूर्व दिल्लीच्या विवेक विहार ठाण्याचे ठाणेदार (एसएचआे) संजय शर्मा यांनी स्वयंघोषित देवीचा अवतार असलेल्या राधे माँला कर्तव्यावर असताना स्वत:ची कार्यालयातील खुर्ची बसण्यासाठी दिली. याप्रकरणी ठाणेदारासह ६ पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांची नियुक्ती कंट्रोल रूमला करत चाैकशी सुरू करण्यात आली आहे. शाहदरा जिल्ह्यातील विवेक विहार ठाण्यामध्ये एसएचआेच्या खुर्चीवर बसलेल्या  राधे माँचे छायाचित्र सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. यात ठाणेदार शर्मा यांच्या खांद्यावर लाल आेढणी दिसत आहे. ते हात जोडून माँच्या बाजूला उभे आहेत. इतर पोलिस कर्मचारीदेखील राधे माँच्या सेवेत तल्लीन असल्याचे दिसते.
  
पूर्व दिल्लीचे अतिरिक्त  आयुक्त रवींद्र यादव यांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिस उपायुक्त चौकशी करत आहेत. एसएचआे संजय शर्मा आणि इतर ५ पोलिस कर्मचाऱ्यांना कंट्रोल रूममध्ये नियुक्ती दिली आहे. यात १ सहायक पोलिस उपनिरीक्षक एक २ हे कॉन्स्टेबल, २ कॉन्स्टेबलचा समावेश आहे. शर्मा यांनी आपल्या बचावार्थ म्हटले आहे की, राधे माँ रामलीला समारंभात सहभागी होण्यासाठी चालली होती. यादरम्यान स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी ठाण्यात आली होती. हे छायाचित्र नवरात्रीतील अष्टमीचे आहे. दिल्ली पोलिसचे विशेष आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी म्हटले की, हे प्रकरण गंभीर आहे. तपास अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...