आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रालोआ सरकारची चमक हरपत चालली,बजाज याचे केंद्राच्या धोरणावर परखड मत, नाराजीही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-ऐतिहासिक विजय मिळवत सत्तेवर आलेल्या रालोआ सरकारची चमक हरपत चालली आहे, असे परखड मत प्रसिद्ध उद्योगपती तथा राज्यसभा सदस्य राहुल बजाज यांनी व्यक्त केले आहे.

एका वृत्तवाहिनीवर मुलाखतीत बजाज म्हणाले, गतवर्षी मे महिन्यात देशाला शहेनशहा (नरेंद्र मोदी) मिळाला होता. २०-३० वर्षांत जगातील कोणत्याही देशात असे यश मिळाले नव्हते. मी सरकारच्या विरोधात नाही, पण सगळे म्हणतात, तेच बोलतोय. दिल्ली विधानसभा किंवा प. बंगालात पालिका निवडणूक निकालांवरून अंदाज येऊ शकेल. भाजपला बिहारमध्ये चांगले सरकार बनवता आले, तर स्थिती पालटू शकते. प. बंगाल, केरळ, आसाम व पुद्दूचेरीकडून थोडी आशा आहे.

नव्या ब्लॅक मनी विधेयकावर बजाज म्हणाले, काळा पैसा जाहीर करण्यासाठी तीन महिने मिळतील. ६० टक्के कर द्यावा लागेल व खटला चालणार नाही. तरीही उद्योगविश्व चिंतेत आहे. अशी घोषणा असली तरी भविष्यात कारवाई होणार नाही याची खात्री देता येत नाही. कायदा मोडणाऱ्या उद्योगपतींविषयी सहानुभूती नाही. पण या कायद्याचा मसुदा पारदर्शक वाटत नाही.
बातम्या आणखी आहेत...