आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे पुरवणार प्रवाशांचे खाण्याचे लाड! मुंबई, नागपूरसह या स्थानकांवर असेल सुविधा उपलब्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रेल्वेतून मिळणाऱ्या जेवणाला नाक मुरडणाऱ्या प्रवाशांसाठी आता गोड बातमी आहे. देशभरातील महत्त्वाच्या ४५ रेल्वे स्थानकांवर आपण ऑर्डर द्याल ते पदार्थ आपल्या जागेवर मिळणार आहेत. ई- केटरिंगचा प्रयोग महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर रेल्वे स्टेशनवर होणार आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी विभागात नवनवे प्रयोग सुरू केले आहेत. आरआरसीटीसीच्या माध्यमातून जेवणाच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी येत अाहेत. त्याची दखल घेतली. रेल्वेच्या जेवणापलिकडे कोणाला जर बाहेरून जेवण मागवायचे असेल तर तिकीट आरक्षित करताना तशी सोय केली जाणार आहे. उदा. मुंबई, पुणे, नागपूर येथे आपणास जेवण हवे असल्यास तसे नमूद करावे लागेल. अंमलबजावणीसाठी किमान १५ दिवस लागतील.
शकेल. कंपनीचे जेवण ऑर्डर केले जाईल त्या कंपन्यांचे कर्मचारी प्रवाशांनी निवडलेल्या स्थानकावर जेवण आणून देतील. कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालय कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कोणत्या स्थानकांचा आहे यात समावेश...