आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व रेल्वेस्थानकांवर पीओएस बसवणार, सहा महिन्यांत ७५ टक्के प्रवाशांना मिळेल विम्याचा फायदा : प्रभू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रेल्वे मंत्रालयाने या वर्षी मे-जूनपर्यंत देशातील सुमारे ७५ टक्के रेल्वे प्रवाशांना विम्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केवळ कॅशलेस बुकिंगला प्रोत्साहन दिले जात आहे. रेल्वेस्थानकांवर पीओएस बसवण्यात येत आहेत, तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला शंभर टक्के प्रवाशांना रेल्वे विमा देण्यात येणार आहे. 
 
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले :  प्रत्येक रेल्वे प्रवाशास रेल्वेकडून प्रवासादरम्यान विम्याची सुविधा मिळायला हवी. यासाठी सर्व उपाययोजना अमलात येत आहेत. मे-जूनपर्यंत सुमारे ७५ टक्के रेल्वे प्रवाशांना या सुविधा मिळणार आहेत. यासाठी नियोजन पूर्ण झाले आहे. नोटाबंदीनंतर रेल्वेमध्ये ई-तिकीट बुकिंगमुळे दररोज सुमारे ६६ कोटी रुपये मिळत आहेत. यापूर्वी ४६ कोटी रुपये प्राप्त होत होते. अशा प्रकारे ई-बुकिंग करणाऱ्यांची संख्या ५५ टक्क्यांपर्यंत गेली आहे. यात वाढ करून ७५ टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे. लवकरच एक अॅप सादर करण्यात येत असून यामुळे त्वरित अारक्षण सुविधा मिळेल. याशिवाय सुमारे २५ ते ३० टक्के रेल्वे प्रवासी तिकीट खिडकीवरून तिकीट विकत घेतात. त्यांनाही रेल्वे विम्याचा लाभ देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येईल. सर्व तिकीट खिडक्यांवर पीओएस बसवण्यात येतील.

चार्ट तयार झाल्यानंतर रिकाम्या आसनांवर १० टक्के सूट
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले : १ जानेवारीपासून सर्व प्रमुख रेल्वेंचा चार्ट तयार झाल्यानंतर रिकाम्या असलेल्या आसनांवर १० टक्के सूट देण्यात येईल. प्रथमच रेल्वेकडून अशा प्रकारची सुविधा देण्यात येत आहे. सर्व उपनगरीय रेल्वेंमध्ये ई-सिझनल तिकिटे घेणाऱ्या प्रवाशांना एकूण रकमेच्या अर्धा टक्का सूट देण्यात येईल.
 
बातम्या आणखी आहेत...