आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीय ध्रुवीकरणाचे राजकारण भाजपने केले नाही : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपने आतापर्यंत कधीच जातीय वा धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण केले नाही आणि यापुढेही करणार नाही, असा निर्धार भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला आहे. सिंग पुढे म्हणाले की, यापुढे उमेदवारांना धर्म, जात, वर्ण, वंश यांच्या आधारावर मते मागणे अवैध व दंडनीय गुन्हा असेल तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर धर्मनिरपेक्ष पक्षांनी यापुढे सावध जागृत राहावयाची गरज आहे.
  
यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले की, जर त्यांच्या पक्षाने राम मंदिराचा मुद्दा भविष्यात म्हणजेच येणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत उचलला तर यावर सिंग यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी सावध होण्याची गरज आहे. न्यायालयाचा निर्णय अगदी योग्यच आहे आणि राजकारणात जात-पात आदी गोष्टी गुंतल्या गेलेल्या नसाव्यात. 
 
 
बातम्या आणखी आहेत...