आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायकवाडांवरील बंदी केंद्राच्या दबावामुळे मागे; एफआयआरचा एअर इंडियाचा स्वतंत्र निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरकारच्या दबावामुळे एअर इंडियाने खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी उठवल्याचे समाेर आले आहे. असे असले तरी गायकवाडांवर बंदी लादण्याचा निर्णय एअरलाइन्सचा होता, याबाबत सरकारशी चर्चा करण्यात आलेली नव्हती, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

खासदार गायकवाड यांनी एअरलाइन्स  वा कर्मचाऱ्यांची माफी मागितली नाही, पण केवळ सरकारच्या आदेशामुळे बंदी मागे घेतल्याचे एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सांगण्यावरून गेल्या शुक्रवारी ही बंदी मागे घेण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...