आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यापासून बँकेतून काढा हवे तेवढे पैसे, बचत खात्यातून पैसे काढण्यावरील निर्बंध संपुष्टात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीनंतर बचत खात्यातून पैसे काढण्याचे निर्बंध सोमवारपासून ( १३ मार्च) संपुष्टात येतील. सध्या बचत खातेधारकांना आठवड्याला आपल्या खात्यातून जास्तीत जास्त ५०,००० रुपये काढता येतात.

रिझर्व्ह बँकेने  गेल्या ८ फेब्रुवारीला चालू आर्थिक वर्षातील अंतिम द्वैमासिक आढावा सादर करताना ही घोषणा केली होती. त्या वेळी बचत खात्यातून पैसे काढण्याची साप्ताहिक मर्यादा २४,००० रुपये होती.  ती २० फेब्रुवारी रोजी वाढवून ५०,००० रुपये करण्यात आली होती. चालू खाते, ओव्हरड्राफ्ट व कॅश क्रेडिट खात्यांतून पैसे काढण्यावरील निर्बंध ३० जानेवारी रोजीच संपुष्टात आणले होते. शिवाय १ फेब्रुवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यावरील निर्बंधही उठवले होते. मात्र बचत खात्यावरील निर्बंध कायम आहेत.
 
 अधिकृतरीत्या निर्बंध संपुष्टात आणले गेले तरी बँकांना एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा ठरवण्याचे अधिकार आहेत. देशाच्या विविध राज्यांतून मिळालेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी काही बँकांतून एटीएममधून आताही २००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम निघत नाही. प्रत्येक बँकेने आपल्या हिशेबाने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा ठरवली आहे. काही बँकांनी एटीएममध्ये असे बदल केले आहेत की एटीएम दुसऱ्या बँकांचे डेबिट कार्ड रीडच करत नाहीत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...