आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेल सेवेवर संतुष्ट नसाल तर सेवा शुल्क देऊ नका, ३५ दिवसांत सरकारने पुन्हा दिले स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारने हॉटेल व रेस्तराँकडून वसूल केल्या जात असलेल्या सेवा शुल्काबाबत ३५ दिवसांत पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार हॉटेल किंवा रेस्तराँची सेवा आवडली नाही तर तुम्ही सेवा शुल्क देण्यास नकार देऊ शकता. सध्या हॉटेल व रेस्तराँ सेवा कराव्यतिरिक्त ५ ते २०% सेवा शुल्क वसूल करत आहेत. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने सोमवारी याबाबत पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे. आता हॉटेल्सना या नियमाचा फलक लावावा लागेल. सर्व राज्यांतील हॉटेल्स व रेस्तराँना या नियमांची यादी लावावी लागेल. त्यात ग्राहक सुरक्षा कायद्यातील तरतुदींचाही हवाला दिला आहे. यापूर्वी २९ नोव्हेंबर रोजी सरकारने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सेवा शुल्क देणे किंवा न देणे ग्राहकांच्या मर्जीवर असल्याचे सांगितले होते. 

यामुळे माझा काय फायदा होईल?  
सध्या हॉटेल व रेस्तराँ ५-२०% सेवा शुल्क आकारतात. तुमचे बिल १००० असेल तर तुमचे ५० ते २०० रुपये वाचतील. 

हे शुल्क सेवा करा‌शिवाय आहे?  
सध्या हॉटेलच्या बिलात तीन बाबी असतात. एक- जेवणाचे बिल. एकूण बिलाच्या ६%  सेवा कर आणि सेवा शुल्क. देणे किंवा न देणे तुमच्या मर्जीवर आहे.

हॉटेलने दबाव टाकला तर...?   
चुकीच्या मार्गाने पैसे घेतले तर अनुचित व्यापार व्यवहार मानला जातो. हॉटेलने बळजबरीने सेवा शुल्क लावल्यास तुम्ही ग्राहक तक्रार निवारण मंचात त्याविरुद्ध दाद मागू शकता.
 
बातम्या आणखी आहेत...