आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/लखनऊ- हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला या पीएच. डी. च्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने न्यायालयीन आयोग स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. हा आयोग तीन महिन्यांत अहवाल सादर करेल.

मंत्रालयाने यासंदर्भात स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीच्या निष्कर्षांच्या आधारे न्यायालयीन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठ परिसरात भेदभावाची वागणूक यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव हे रोहितच्या आईच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले होते, पण त्यांना भेट नाकाररण्यात आली. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी रोहितच्या आईशी फोनवर बोलून त्यांचे सांत्वन केले.
पंतप्रधान मोदी झाले भावुक
लखनऊच्या डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहितच्या आत्महत्येवरील मौन सोडले. भावुक होत ते म्हणाले, ‘त्याच्या कुटुंबीयांची मन:स्थिती कशी झाली असेल? भारतमातेने आपला एक सुपुत्र गमावला आहे. आत्महत्येमागे कुठले तरी कारण असेल. मात्र एका आईने आपला मुलगा गमावला आहे ही वस्तुस्थिती आहे. मी त्यांचे दु:ख समजू शकतो. या वेळी दोन विद्यार्थ्यांनी मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या.