आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवांच्या जन्मतारखा सांगा, RTI मधून मागितली माहिती, पुरातत्व अधिकारी \'धर्मसंकटात\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नागपूर येथील मनोज राजपुत यांनी माहिती अधिकाराचा वापर करून देवी-देवतांच्या जन्मतारखा सांगण्याची मागणी केली आहे. मात्र, या आरटीआयमुळे पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. देवांच्या जन्म तारखांचा शोध घेण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दिड महिण्यापूर्वी मनोज राजपूत यांनी आरटीआय दाखल केली होती. परंतु, अद्याप पुरातत्व खात्याने संबंधित माहिती पाठवलेली आहे.

मनोज राजपुत यांनी ब्रम्हा, विष्णू, राम, रावण, महादेव शंकर, हनुमान, शनी देव, नारद, तसेच पर्वती, शारदा, दुर्गा, लक्ष्मी यांच्यासह 70 देवी आणि देवतांच्या जन्म आणि मृत्युच्या तारखांची माहिती मागितली आहे.

देशात अनेक ठिकाणी या देवांची मंदिरे आहेत. अशा ठिकाणी असलेली देवांबाबतची सविस्तर माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने स्थानिक केंद्रांकडून मागवली आहे. त्यातील काही केंद्रांनी आपल्याकडे संबंधित माहिती नसल्याचे पुरातत्त्व विभागाला कळवले आहे, तर काही संस्थानांनी RTI ची प्रत परत पाठवली आहे. यातील काही देवस्थाने देवांचे जन्मस्थळ म्हणून ओळखली जातात. अशा देवस्थानांनी भक्तांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये या भितीने माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.
  
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...