आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एस. पी. त्यागींनी जमवली कोट्यवधींची मालमत्ता, सीबीआयच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांनी आपल्या कार्यकाळात गुडगावमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. सीबीआयच्या उच्चपदस्थ सूत्रांनी हा दावा केला.
 
सूत्रांच्या माहितीनुसार, त्यागींनी सरकारपासूनही ही माहिती लपवली. नियमांनुसार त्यांनी ही माहिती सरकारला देणे अनिवार्य होते, पण त्यांनी तसे केले नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, त्यागींनी अद्यापपर्यंत मध्यस्थाची भेट घेतल्याचा इन्कार केला नाही. संरक्षण करारात मध्यस्थांना बंदी आहे. त्यामुळे त्यागींनी करार रद्द करण्याची शिफारस का केली नाही, असा प्रश्न उद्भवतो. बाजू जाणून घेण्यासाठी त्यागींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यांनी कुठलेही उत्तर दिले नाही. ऑगस्टा घोटाळ्यात अटक झालेले त्यागी सध्या जामिनावर आहेत.
संजीव त्यागी, खेतान यांना जामीन : दरम्यान,  या घोटाळ्यातील इतर दोन आरोपी संजीव त्यागी आणि अॅड. गौतम खेतान या दोघांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला. दोघांनाही प्रत्येकी २ लाख रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि तेवढ्याच रकमेची हमी द्यावी लागेल. 
 
बातम्या आणखी आहेत...