आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीडीपी वृद्धी 7.1 % राहण्याची शक्यता : एचएसबीसीचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आगामी आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर ७.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. बँकांकडे रोकडचे पुरेसे प्रमाण आणि अर्थसंकल्पात घोषित योजनांमुळे आर्थिक घडामोडींना अधिक चालना मिळू शकते, असे एचएसबीसी या जागतिक संघटनेने एका अहवालात म्हटले आहे.

या अहवालानुसार, जुन्या नोटांच्या जागी नव्या नोटांचा पुरवठा वाढवल्याने वृद्धीचा दर उच्चस्तरावर पोहोचण्यास मदत होईल. नोटबंदीमुळे देशभरात चलन तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत चलन पुरवठ्याची स्थिती निवळून जाईल. त्यामुळे उपभोगाचा स्तर वाढेल. 

एचएसबीसी इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांच्या मते, २०१७-१८ मध्ये जीडीपीचा वार्षिक वृद्धी दर ७.१ टक्क्यांपर्यंत राहू शकतो. तर २०१६-१७ मध्ये तो ६.३ टक्के इतका असण्याचा अंदाज आहे. बाजारात नव्या नोटांचा पुरवठा जसजसा वाढू लागेल आणि देशभरात या नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील. तसतसी उपभोग क्षमता वाढीस लागून वृद्धी दर कायम होऊन जाईल.
बातम्या आणखी आहेत...