आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रमुख भारतवंशीय सत्या नाडेला महिनाअखेर भारत भेटीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रमुख भारतवंशीय सत्या नाडेला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भारत भेटीवर येणार आहेत. मुंबई येथे आयोजित ‘फ्युचर डिकोडेड’ या परिषदेला ते या वेळी संबोधित करतील. आगामी २१ आणि २२ फेब्रुवारीला मुंबईत आयोजित या परिषदेत सुमारे १५०० दिग्गज उद्योजक आणि सरकारी अधिकारी उपस्थित राहतील.
 
नाडेला यांच्याशिवाय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, एमआय ५ चे माजी संचालक लॉर्ड जोनाथन इव्हान्स, टाटा मोटर्सचे सीईओ गुयेन्टर बस्चेक आणि हावेल्सचे अध्यक्ष अनिल राय गुप्ता यांची या परिषदेत प्रमुख उपस्थिती असेल. शासन, शिक्षण, बँक, रुग्णालये, ई-कॉमर्स, मनोरंजन आणि उत्पादन क्षेत्र आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सक्षम बनवण्यात डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका किती प्रभावी बनत आहे यावर या परिषदेत प्रामुख्याने चर्चा होणार आहे. 

जागतिक स्तरावर नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेकदा भारताचा दौरा केला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एची बी १ व्हिसा बंदीवर उचललेल्या पावलांचा नडेला यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांनी लिंक्ड इन या सामाजिक संकेतस्थळावर पोस्ट केली आहे की, स्थलांतरित आणि एका कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन्ही अंगांनी मी इमिग्रेशन प्रणालीचा कंपन्यांवर होणारा परिणाम अनुभवला आहे. त्यामुळे याचा कौशल्यपूर्ण मनुष्यबळावर मोठा परिणाम होऊ शकतो. दरम्यान, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे अध्यक्ष यांनी ट्रम्प यांच्या या धोरणाचा मायक्रोसॉफ्टमधील ७६ टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल, असे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...