आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धान्य खरेदीत ४० हजार कोटींचा घोटाळा : कॅग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - धान्य खरेदी आणि मिलंगमध्ये ४०,५६४ कोटी रुपयांची अनियमितता आढळली असल्याचा अहवाल नियंत्रक तथा महालेखा परीक्षकांच्या (सीएजी -कॅग) वतीने मंगळवारी संसदेत सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार सरकारच्या वतीने १८,००० कोटी रुपये एमएसपीच्या स्वरुपात देण्यात आले असले तरी राज्य सरकारच्या एजन्सीच्या वतीने शेतकऱ्यांना योग्य पैसे दिले आहेत का, याची तपासणी झाली नसल्याचे मत नोंदवण्यात आले आहे.

या संदर्भात हरियाणा, पंजाब, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात गैरप्रकार असल्याचे आढळून आले आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे हे स्पष्ट होत नाही. तसेच त्यांची योग्य ओळख होत नव्हती अशा शेतकऱ्यांनाही पैसे देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा खाते क्रमांक आणि गावांची नावे देखील नसल्याचे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कॅगच्या या अहवालानुसार कंपन्यांना ३,७४३ कोटी रुपयांचा बेकायदा फायदा मिळवून देण्यात आला आहे. मिलंगमध्ये निघणाऱ्या सह-उत्पादनाला यात जोडण्यात आलेले नाही. सह-उत्पादनाच्या किमती दरवर्षी वाढत गेल्या तरी देखील २००५ पासून मिलिंग चार्जमध्ये बदल करण्यात आलेला नाही.
बातम्या आणखी आहेत...