आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने रोखे योजनेचा दुसरा टप्पा अठरापासून, 18 ते 22 जानेवारीपर्यंत मुदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बँकेच्या वतीने सोने-रोखे योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार असून यासाठी १८ ते २२ जानेवारीची मुदत असणार अाहे, अशी माहिती अर्थ विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनी गुरुवारी दिली. बँकांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.
देशात सोन्याची मागणी कमी करण्यासाठी सरकारच्या वतीने ही योजना जाहीर करण्यात आली आहे. सोन्याची मागणी कमी होऊन लोकांना डीमॅट किंवा कागदाेपत्री (पेपर फॉर्म) सोने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच नोव्हेंबरलाच या योजनेला सुरुवात केली असून याच्या पहिल्या टप्प्यात ९१५.९५ किलो सोन्याच्या मूल्याच्या बरोबरीत गुंतवणुकीसाठी २४६ कोटी रुपयांचे ६३,००० अर्ज आले होते. सोन्याचे रोखे पाच, १०, ५० आणि १०० ग्रॅमच्या स्वरूपात पाच ते सात वर्षांसाठी देण्यात आले आहेत.