आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\"जीएसटी\' मंजुरीच्या अपेक्षेमुळे बाजारात तेजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी मजबुतीसह बंद झाले. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सोमवारी ०.५८ टक्क्यांची तेजी दिसून आली. जागतिक बाजारातून मिळणाऱ्या नकारात्मक संकेतांकडे कानाडोळा करून भारतीय बाजाराने उसळी घेतली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. बाजाराला हिवाळी अधिवेशनात जीएसटी विधेयक पास होण्याची अपेक्षा असल्यामुळेच त्याचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर दिसला.

सोमवारी झालेल्या व्यवहारामध्ये बँक निफ्टी १.५ टक्के, इंफ्रा, एफएमसीजी आणि रिअल्टी इंडेक्स एक टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी ३० शेअर असलेला प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स १४९ अंकांनी वाढून २५,७६० च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा प्रमुख इंडेक्स निफ्टी ४४ अंकांनी पडून ७८०६ च्या पातळीवर बंद झाला.

अर्थमंत्र्यांचा पुढाकार
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जीएसटी बिल मंजूर करण्यासाठी सरकारच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. जीएसटी बिल पास करण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस मंत्र्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्याची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे देखील सहयोग करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यामुळे बारातील वातावरण सकारात्मक झाले.