Home »National »Delhi» News About Shivsena Leaders Meet Rajnath Singh In Delhi

शिवसेना नेत्यांच्या केंद्रातील नेत्यांबरोबर भेटीगाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केली चर्चा

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 16:42 PM IST

  • शिवसेना नेत्यांच्या केंद्रातील नेत्यांबरोबर भेटीगाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केली चर्चा
नवी दिल्ली - राज्यातील शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ व्हावे यासाठी शिवसेनेने सोमवारी आणखी एक प्रयत्न केला. शिवसेनेच्या राज्यातील मंत्र्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्रिमंडळातील नेत्यांची भेट घेऊन कर्जमाफीबाबत चर्चा केली शिवसेनेच्या या शिष्टमंडळामध्ये दिवाकर रावते, विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांचा समावेश होता.

राज्यातील अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या नेत्यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केंद्राने मदत करण्याची मागणी केली होती. त्याला जेटली यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही सांगितले होते. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मजबूत तडजोडी असतील या अपेक्षेने शिवसेनेने अर्थसंकल्प सादर करताना विरोध न करण्याचा निर्णयही घेतला होता. पण राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात काहीही ठोस पावले उचलली जात नसल्याचे लक्षात आल्याने शिवसेनेने स्वतःच त्यासाठी प्रयत्न केले असल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेना नेते दिवाकर रावते, विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांच्याबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती मांडून त्यांच्या कर्जमाफीसाठी मदत करण्याची मागणी केली. तसेच संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांचीदेखिल शिवसेना नेत्यांनी भेट घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या नेत्यांबरोबर नेमकी काय चर्चा झाली आणि त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळाला याबाबत मात्र काहीही माहिती मिळालेली नाही.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended