आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाट्टेल तसे भांडा पण आपसात नुकसान व्हायला नको : मुलायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - समाजवादी पक्षाची सायकल कोणाची? यावर मुलायमसिंग आणि अखिलेश यांच्या गटांनी निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडली. पण निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवला. मुलायमसिंग अजूनही पक्ष वाचवण्याच्या मन:स्थितीत आहेत. ते मार्गदर्शकांची भूमिका वठवण्यास तयार आहेत. कोणाचे नुकसान होऊ नये असे त्यांना वाटते. 

मुलायमसिंग यादव,शिवपाल यांच्यासोबत निवडणूक चिन्ह सायकलवर  हक्क सांगण्यासाठी आयोगाच्या कार्यालयात गेले होते. अखिलेशकडून रामगोपाल यादव कपिल सिब्बल यांच्यासमवेत गेले होते.  सुनावणी दरम्यान आयोगाने त्यांना आपसात तडजोड करण्यासंदर्भात विचारणा केली. तेव्हा दोघांनी होकार दर्शवला. तेव्हा बाहेर जाऊन चर्चा करा असे सुचवले.  त्यांच्यात काय बोलणी झाली ते सांगण्यास दोघांनीही नकार दिला. पण कपिल सिब्बल यांनी मुलायमसिंगाशी जास्तवेळ चर्चा केली. यावेळी ते म्हणाले :  आपसात जितके भांडायचे असेल तेवढे भांडा पण त्यामुळे दोघांचेही नुकसान व्हायला नको, हे लक्षात घ्यावे.