आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या २० स्मार्ट सिटी; आज घोषणा, औरंगाबाद शहरही स्पर्धेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्मार्ट सिटी म्हणून विकसित केल्या जाणाऱ्या पहिल्या २० शहरांची गुरुवारी घोषणा केली जाणार आहे. स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेतील ९७ शहरांतून २० शहरांची निवड केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली. आैरंगाबाद शहराचाही या स्पर्धेत समावेश आहे.

या स्मार्ट सिटींमध्ये मूळ पायाभूत सुविधांसह, वीज-पाणी, कचरा निर्मूलन, मलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था, आयटी कनेक्टिव्हिटी, ई-गव्हर्नन्स आणि नागरिकांचे सहभागित्व आदी वैशिष्ट्ये असतील. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या या महत्त्वाकांक्षी याेजनेतील पुढील ४० शहरांच्या नावांची घोषणा आगामी काही वर्षांत केली जाणार आहे.