आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमनाथ भारती बेपत्ता; शरण या : केजरीवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे माजी कायदामंत्री आणि आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती पुन्हा बेपत्ता झाले आहेत. दिल्ली पोलिस बुधवारी सकाळी त्यांना अटक करण्यासाठी गेले तेव्हा घरी आणि कार्यालयातही सापडले नाहीत. सोमनाथ यांच्या अशा वागणुकीवर नाराज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करून त्यांना शरण येण्यास सांगितले आहे. अखेर ते पळून का जात आहेत. तुरुंगात जाण्यास का भीत आहेत. त्यांच्यामुळे आता पक्ष आणि कुटुंब लाजिरवाणे होत आहे. भारती यांनी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाले पाहिजे.

भारतींच्या शोधमोहिमेत पोलिसांनी त्यांच्या दोन निकटवर्तीयांची चौकशी केली. यात त्यांचे भाऊ लोकनाथ आणि खासगी सचिवाचा समावेश आहे. सोमनाथ यांची पत्नी लिपिका मित्रा यांनी त्यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे.

केजरीवाल यांनी शरण येण्याचा सल्ला दिल्याबद्दल लिपिका यांनी त्यांचे आभार मानले आहेत. सोमनाथ यांची बहीण स्तुती म्हणाल्या, केजरीवाल यांचे मत वैयक्तिक असू शकते. सोमनाथ आताच शरण येणार नाहीत. ते सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची वाट पाहतील. ते पळून जात नसून योग्य वेळी पोलिसांसमोर हजर होतील. पोलिस त्यांचा छळ करू इच्छित आहे.