आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’चे सोमनाथ भारती यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, उच्च न्यायालयाने फटकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे माजी कायदामंत्री आणि आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. न्यायालयाने त्यांच्या कार्यपद्धतीबाबतही चांगलेच सुनावले. न्यायालय म्हणाले, तुम्हाला पोलिस ठाण्यात जाण्याचे प्रेम आहे. आम्ही तुम्हाला येथून पाठवू. तुम्हाला एकदा दिलासा मिळाल्यानंतर तुम्ही सिंहासारखे वागू लागलात. आता तुम्ही इथून तिथे जात आहात.
यामुळे सोमनाथ भारती यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. पत्नी लिपिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमनाथ यांच्याविरुद्ध कौटुंबीक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात सोमनाथ यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळून अजामीनपात्र वाॅरंट जारी केले होते. यानंतर भारती यांनी त्यास दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने दोन वेळा त्यांची अटक लांबणीवर टाकली होती. उच्च न्यायालयाकडून १५ सप्टेंबर रोजी दिलासा मिळाल्यानंतर सोमनाथ रात्री २.०० वाजता द्वारका पोलिस ठाण्यात पोहोचले होते. तिथे उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावर न्या. सुरेश कैत यांनी त्यांना फटकारले. असे असले तरी भारती यांचे वकील विजय अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे सुतोवाच केले.

महिला आयोगावर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह :
दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी सोमनाथ भारती यांच्या कौटुंबीक हिंसाचार प्रकरणात दिल्ली महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, आयोगाने भारती प्रकरणात सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. मात्र, आयोग गप्प आहे. यामुळे आयोगाच्या विश्वासहार्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आयोगाने आपचे नेते कुमार विश्वास यांच्या प्रकरणातही काहीच केले नाही.
घर, कार्यालयात पोलिस
याचिका फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिस भारती यांना अटक करण्यासाठी मालवीय नगर येथील त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, तिथे त्यांना भारती सापडले नाही. त्यांच्याशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला ,परंतु फोन बंद असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे, आम आदमी पार्टीने पोलिस भारती प्रकरणात जास्तच उत्साह दाखवला जात असल्याचा आरोप केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी भारतींना शरण येण्याचा सल्ला दिला.