आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपाचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच; शिवपाल प्रदेशाध्यक्ष : मुलायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - समाजवादी पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच आहे आणि प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादवच आहेत, असे मुलायमसिंह  यांनी रविवारी ठणकावून सांगितले.

तत्पूर्वी रविवारी दुपारी मुलायम यांनी मुख्यमंत्री अखिलेश आपला पोटचा मुलगा असल्याचे सांगत तो काही परका नाही, असे म्हटले होते. यामुळे मुलायम यांनी सत्तेच्या या लढाईत मुलासाठी माघार घेतली असल्याचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सायंकाळपर्यंत मुलायम यांनी पुन्हा भूमिका बदलली आणि अखिलेशविरुद्ध आता रणांगणातच उतरण्याचा निर्णय जाहीर केला. आपणच सपाचे सर्वेसर्वा असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले.