आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे हवेबरोबर वाहत नाहीत तेच हवेची दिशा बदलतात- नरेंद्र मोदी, कार्यकारिणीच्या बैठकीत भाषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. त्यांनी सांगितले की, भाजपला आपल्या लाखो कार्यकर्त्यांचे समर्पण प्राप्त आहे. जो हवा के साथ नहीं बहते, वही हवा का रुख मोडते हैं. म्हणजे अर्थातच जे जशी येईल त्या हवेबरोबर न जाता थांबतात, वाहवत जात नाहीत तेच हवेची दिशा बदलू शकतात अन् बदल घडवून आणू शकतात. भाजपचे कार्यकर्ते जमिनीवर राहणारे आहेत आणि ते वास्तविकता जाणून आहेत. त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना प्रभावी पद्धतीने काम करण्यास सांगितले.   

भाजपच्या दोनदिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील अंतिम दिवशी बोलताना मोदींनी सांगितले की, सरकारची प्राथमिकता गरिबांचे जीवनस्तर सुधारणे ही आहे. त्यांनी सांगितले की, गरीब व्होट बँक नव्हे, तर त्यांची सेवा करणे म्हणजे ईश्वराची सेवा करण्यासमान अशी संधी आहे. देशातील गरिबांनी नोटाबंदीच्या निर्णयाला स्वीकारले. काही लोकांसाठीच जीवनशैली चिंतेचा विषय आहे. त्यांनी गरिबी दूर करण्यासाठी जनधन, बेटी बचाआे बेटी पढाओ आणि स्वच्छ भारतसारख्या योजनांचीही उल्लेख केला. मोदींनी सांगितले की, नोटांचा अनियंत्रित विस्तारच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे कारण आहे. नोटाबंदीने यावर लगाम लागला आहे.
  
राजकारणात पारदर्शकता आणि साधनशुचिता यावरही पंतप्रधानांनी जोर दिला. त्यांनी सांगितले की, पक्षांच्या निधीचा तपशील सार्वजनिक असावा, जेणेकरून सामान्य लोकांनाही समजेल की, पक्षांकडून पैसा नेमका येतो कुठून? टीकाकारांना घाबरण्याऐवजी त्यांचे स्वागत करावयास पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...