आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनंदा पुष्करप्रकरणी तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे अादेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने माजी मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी 3 दिवसांत चाैकशी अहवाल सादर करण्याचे अादेश दिल्ली पाेलिसांना दिले अाहेत. न्यायाधीश जी.एस.सिस्तानी व चंद्रशेखर यांच्या पीठाने भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना गुरुवारी हे अादेश दिले. दरम्यान, या वेळी स्वामी यांनी सुनंदा मृत्यू प्रकरणाच्या चाैकशीची माॅनटरिंग करण्याची व त्यासाठी विविध संस्थांच्या अधिकाऱ्यांचे चाैकशी पथक तयार करण्याची मागणी न्यायालयाकडे केली.

या प्रकरणात साडेतीन वर्षांत काय कारवाई झाली याची माहितीदेखील न्यायालयाने पाेलिसांकडे मागितली अाहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ अाॅगस्ट राेजी हाेणार अाहे. १७ जानेवारी २०१४ राेजी दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकीत हाॅटेलमध्ये सुनंदा पुष्कर या मृतावस्थेत अाढळून अाल्या हाेत्या. सुनंदा यांचा मृत्यू हे खून असल्याचे स्वामी यांनी याचिकेत म्हटले अाहे. त्याचप्रमाणे शशी थरूर हे भाजपच्या काही जणांकडून सहकार्य मागत अाहेत. सीबीअाय चाैकशीवर  हरकत नसल्याचे दिल्ली पाेलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...