आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांना 31 मार्चपर्यंत जुन्या नोटा जमा का करू देऊ नये?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ३१ मार्चपर्यंत सर्वांना ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा जमा का करू देऊ नये, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) केला आहे. या नोटिसीचे उत्तर शुक्रवारपर्यंत द्यायचे आहे.
 
सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शरद मिश्रा यांच्या याचिकेवर या नोटिसा बजावल्या. सोमवारीच या नोटिसीच्या प्रती केंद्र व रिझर्व्ह बँकेला तामील कराव्यात असे याचिकाकर्त्यास सांगितले. नोटबंदीनंतर ३० डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बँकेत जमा करून घेण्यात आल्या. या कालावधीत जर कुणाला जुन्या नोटा जमा करता आल्या नाहीत तर ३१ मार्च २०१७ पर्यंत आरबीआयमध्ये जमा करता येतील, अशी घोषणा पंतप्रधान व आरबीआयने केली होती. मात्र नंतर नियम बदलण्यात आला. ३१ मार्चपर्यंतची सवलत केवळ अनिवासी भारतीयांनाच मिळत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...