आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात पहिल्यांदाच गंगेतील दुर्मिळ डॉल्फिनची पाहणी, काय होईल फायदा?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दुर्मिळ डॉल्फिनच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. गंगा नदीतील डॉल्फिनच्या अस्तित्वाचा वेध घेण्यासाठी १ मार्चपासून पाहणी सुरू झाली आहे.  

उत्तर प्रदेशातील बिजनोरपासून जवळ असलेल्या नरोरामध्ये गेल्या बुधवारी शास्त्रीय पाहणीला सुरुवात झाली. लुप्त होत असलेल्या डॉल्फिनसाठी राबवण्यात येणारी ही देशातील पहिलीच मोहीम आहे. पहिल्या टप्प्यात १६५ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले जाईल. त्यानंतर अलाहाबाद ते वाराणसी या सुमारे २५० किलोमीटरमध्ये डॉल्फिनचा शोध घेण्यात येईल. हा टप्पा या आठवड्यात सुरू होईल. गंगा नदी प्रदेशात २ हजार ५२५ किलोमीटर लांब आहे. उत्तराखंडपर्यंत ही मोहीम चालेल. नमामि गंगे कार्यक्रमांतर्गत ही पाहणी पूर्ण केली जाईल. २०१५ मध्ये अशा प्रकारची पाहणी हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ते काम पुढे सरकू शकले नव्हते. राज्यांचे सहकार्य मिळाले नव्हते. तेव्हा उत्तर प्रदेशने सहकार्य केले होते. बिहारने मात्र टाळले होते.  
 
काय होईल फायदा?  
गंगा नदीच्या पाण्याच्या दर्जा नेमका कसा आहे, याची प्राथमिक पातळीवरील शास्त्रीय माहिती सरकारला मिळणार आहे. त्यातून नदीच्या शुद्धीकरणासाठी नेमके कशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत, हेदेखील सरकारला ठरवता येऊ शकेल. डॉल्फिनच्या सवयी, आढळ याबद्दलची सविस्तर माहिती पुढील नियोजनासाठी उपकारक ठरणार आहे.  
 
तेव्हा आढळले होत उ.प्र.त १, २६३ डॉल्फिन  
५ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०१५ मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या पाहणीत १ हजार २५३ डॉल्फिनचे अस्तित्व दिसून आले हाते.  गंगा प्रवाहात त्यांचा आढळ होता. वाराणसीत २६९, फतेहपूरमध्ये १७५ डॉल्फिन आढळून आले होते.  
 
डेहराडूनच्या संस्थेकडे समन्वयाची जबाबदारी  
गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यांतून वाहते. केंद्र सरकारने हाती घेतलेल्या या अभ्यासात आठ एनजीआेंचा सहभाग आहे. डेहराडूनची वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सर्व राज्यांशी समन्वयाची जबाबदारी पार पाडेल.  
बातम्या आणखी आहेत...