आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राफेल’ची भारतीय पथक करणार पाहणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय वायुदल आणि संरक्षण विभागातील वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांचा एक चमू पुढच्या आठवड्यात फ्रान्समध्ये जाणार आहे. या भेटीदरम्यान अधिकारी राफेल विमानांच्या उत्पादनाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतील. 

भारताने फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने विकत घेतली आहेत. या व्यवहारातील सुमारे ७८० कोटी रुपयांचा दुसरा हफ्ता फ्रान्सला यंदा दिला जाणार आहे. तर फ्रान्सकडून भारताला २०१८ पर्यंत राफेलचे पहिले लढाऊ विमान मिळण्याची शक्यता आहे. शत्रूराष्ट्रांकडून संभाव्य धोके लक्षात घेऊन भारताने वायुदलात अत्याधुनिक लढाऊ विमान आणण्याची योजना केली आहे. राफेलमध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्र तसेच शस्त्रास्त्र सुविधा देण्यात आली आहे.  याच धर्तीवर ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सशी सुमारे ५९ हजार कोटी रुपयांचा सौदा करण्यात आला आहे. राफेलच्या सौद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले होते. 
बातम्या आणखी आहेत...