आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आता पॅरालिम्पिकपटूचे बायोपिक करणार, पॅरालिम्पिकपटू मुरलीकांत पेटकर यांच्यावर बनणार चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टीम इंडियाचा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकनंतर सुशांतसिंग राजपूत आता पुन्हा एकदा क्रीडापटूच्या बायोपिकमध्ये झळकू शकतो. या वेळी सुशांत क्रिकेटपटू नव्हे, तर पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू मुरलीकांत पेटकरची भूमिका पार पाडेल. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत. मात्र, चित्रपटासाठी सुशांतसिंग राजपूतचे नाव निश्चित झाले आहे. या चित्रपटाबाबत सुशांत खूप उत्साहित आहे. ‘मी मुरलीकांत यांची जीवनकथा ऐकली आहे. त्यांची जीवनकथा ऐकताच हा चित्रपट करण्याचे मी ठरवले. मुरलीकांत यांचे जीवन खूप प्रेरणादायी आहे.’

पेटकर यांनी कधीच आपल्या शारीरिक अपंगत्वाला आपल्या स्वप्नांच्या आड येऊ दिले नाही. अपंगत्व कधीच त्यांच्यासाठी अडथळा ठरले नाही. जो व्यक्ती स्वप्न पाहतो आणि ते पूर्ण करतो, अशा व्यक्तींची भूमिका करणे मला आवडते, असेही सुशांत म्हणाला. पेटकर भारतीय सैन्यदलात क्राफ्टमॅन रँकचे जवान होते. १९६५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध युद्धात ते गंभीररीत्या जखमी झाले. युद्धात बुलेटशूटमध्ये जखमी झाल्यानंतर सेनेतील त्यांचे करिअर संपुष्टात आले. मात्र, या घटनेनंतरसुद्धा मुरलीकांत यांच्यातील धैर्य आणि जिद्द संपली नाही. अपंगत्व आल्यानंतरसुद्धा देशासाठी काही तरी करण्याचे स्वप्न ते बघत होते. यानंतर पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होऊन त्यांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिले.

सेनेत असतानासुद्धा मुरलीकांत यांचा खेळात रस होता. ते सुरुवातीपासून क्रीडापटू होते. नंतर त्यांनी खेळालाच पुढे वाढवले. अपघातापूर्वी मुरलीकांत बॉक्सिंग करायचे. नंतर त्यांनी जलतरणाकडे मोर्चा वळवला. यानंतर टे.टे.तही नशीब आजमावले.
 
१९६९ मध्ये रचला होता इतिहास  
मुरलीकांत यांनी सर्वप्रथम १९६८ मध्ये पॅरालिम्पिकमध्ये टेबल टेनिस खेळात देशाचे प्रतिनिधित्व केले होते. त्या वेळी त्यांनी दुसरी फेरी गाठली होती. १९६९ च्या पॅरालिम्पिकमध्ये वैयक्तिक श्रेणीत त्यांनी हे यश मिळवून इतिहास रचला होता. १९७२ मध्ये त्यांनी जलतरणात ३७.३३१ सेकंदांसह ६० मीटर फ्रीस्टाइलमध्ये विश्वविक्रम केला. यानंतर त्यांनी पॅरालिम्पिकमध्ये वैयक्तिक श्रेणीत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. मुरलीकांत पेटकर यांनी जलतरणात भारतासाठी ४ आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. 
बातम्या आणखी आहेत...