आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅन कार्ड शुल्कात १ रुपयाने वाढ, स्वच्छ भारत कर लागू झाल्याने झाले बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्वच्छ भारत कराच्या अंमलबजावणीमुळे आता पॅनच्या (पर्मनंट अकाउंट नंबर) शुल्कातही वाढ झाली आहे. त्यासाठी नागरिकांना १०७ रुपये द्यावे लागणार आहेत.
सेवाकराबरोबर ०.५ टक्के स्वच्छता करही द्यावा लागणार आहे. १५ नाेव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार पॅनचे नवीन दर वाढवण्यात आले आहेत, असे आयकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर कर भरला जातो. त्यांना आयकर विभागाकडून पॅन क्रमांक दिला जातो. त्या कार्डसाठी १०६ रुपये द्यावे लागत होते. मात्र, नवीन कर लागू झाल्यामुळे त्यात वाढ झाली. परदेशातील पॅन कार्ड सेवेसाठी आयकर विभागाने शुल्कात ९८९ रुपये अशी वाढ केली आहे. पूर्वी ९८५ रुपये शुल्क होते.

पोहोच वाढवण्यावर भर
सरकारने पॅनधारकांची संख्या वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी अधिकाधिक आयकरदात्यांचा समावेश त्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मूळ शुल्क ९३ रुपये
पॅन कार्डचे मूळ शुल्क
९३ रुपये आहे

-त्यात स्वच्छता करासह नवीन सेवा शुल्क १४ रुपये मिळून

-नवे दर १०७ असे लागू करण्यात आले आहेत.