आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलॉन, सिंथेटिक मांजावर देशात बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली - राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) मंगळवारी नायलॉन व ज्याचे विघटन होणे शक्य नाही अशा प्रकारच्या कोणत्याही सिंथेटिक पदार्थापासून बनवलेल्या किंवा कोटिंग असलेल्या पतंगाच्या मांजावर बंदी आणली आहे. हा मांजा पशुपक्षी आणि मानवी आयुष्यासाठी धोकादायक असल्याचे एनजीटीने सांगितले. 
 
लवाद प्रमुख न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांच्या पीठाने सर्व राज्य सरकारांना पतंग उडवण्यात वापरल्या जाणाऱ्या सिंथेटिक मांजा वा नायलॉनच्या धाग्यांची निर्मिती, विक्री, साठवणूक, खरेदी आणि वापरावर बंदी आणण्याचे आदेश दिले. नायलॉन, चीनी आणि शिसेयुक्त सूती मांजावरही हा बंदीचा आदेश लागू असेल.
बातम्या आणखी आहेत...