आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रात तेलाची गळती; एनजीटीने मागवले उत्तर, पर्यावरण मंत्रालयाला नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तामिळनाडूच्या समुद्रात काही टन तेल गळती झाल्याच्या घटनेबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर विभागांकडून उत्तर मागवले आहे. तेल गळती झाल्याने पीडितांना भरपाई द्यावी आणि गळतीसाठी जबाबदार असलेले जहाज जप्त करावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीवेळी एनजीटीने हे आदेश दिले. उत्तर देण्यासाठी मंगळवारपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे.  

एनजीटीचे अध्यक्ष स्वतंत्रकुमार यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याव्यतिरिक्त वन आणि पर्यावरण मंत्रालय, केंद्र आणि राज्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ, जहाज मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे. समुद्रात तेल पसरले असून ते स्वच्छ करण्याच्या मोहिमेवर निगराणी ठेवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. समुद्रात अनेक टन पेट्रोलियम पदार्थ पसरला असल्याने पर्यावरण आणि समुद्रातील जलजीवांचे मोठे नुकसान झाले आहे, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.  

चेन्नईच्या एन्नोर बंदराजवळ २८ जानेवारीला एमव्ही मॅपल आणि एमटी डॉन कांचीपुरम नावाच्या जहाजांची धडक झाली होती. या अपघातात कांचीपुरममध्ये अनेक टन पेट्रोलियम पदार्थ समुद्रात वाहून गेले होते. त्यामुळे समुद्रातील जलजीवांना मोठा फटका बसला आहे.  तेलगळतीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने गेल्या काही वर्षांत दिसून आले. 
 
मानवी चुकीमुळे गळती  जयकुमार यांची माहिती 
चेन्नई - समुद्रात झालेली तेल गळती ही मानवी चुकीमुळे झालेली दुर्भाग्यपूर्ण घटना आहे, असे प्रतिपादन तामिळनाडूचे मंत्री डी. जयकुमार यांनी केले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, समुद्राची स्वच्छता करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तेल गळतीस कारणीभूत ठरलेल्या दोन्ही जहाजांना थांबवण्यात आले आहे. गळतीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. तेल पसरल्यानंतर समुद्रातून काढलेले मासे खाण्यालायक नाहीत, हे वृत्त चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...