आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंदालची सुनावणी आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, जिंदालच्या जिवाला धोका असल्याचे कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लष्कर-ए-तोयबाचा संशयित दहशतवादी आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अबू जिंदाल ऊर्फ जबिउद्दीन अन्सारी याची सुनावणी आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाईल. त्याच्या जिवाला धोका असल्याचे एनआयएने सांगितल्यानंतर दिल्लीतील कोर्टाने हे आदेश दिले.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जिंदालच्या जिवाला धोका असल्याचे सांगून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी व्हावी, अशी विनंती केल्यानंतर कोर्टाने ही विनंती स्वीकारून मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगाधकाऱ्यांना यासंबंधीचे आदेश पोहचते करावेत, असे निर्देश दिले.
अबू जिंदाल सध्या या तुरुंगात बंदिस्त असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी तुरुंगात खास व्यवस्था करण्याचे आदेश तुरुंग प्रशासनाला देण्याची सूचना कोर्टाने केली. २४ सप्टेंबरला ही सुनावणी होत आहे. महाराष्ट्र सरकारने अबू जिंदालची सुनावणी इतर कोणत्याही कोर्टात करण्याबाबत एक ठराव पारत केला होता.

मे २०१३ पासून सुनावणी खोळंबली : जिंदाल याच्या जिवाला धोका असल्याच्या कारणावरून या प्रकरणाची सुनावणी मे २०१३ पासून खोळंबली आहे. जिंदाल यास यानंतर कोणत्याही कोर्टात हजर करण्यात आलेले नाही. दिल्ली येथील कोर्टात तर त्याला हजर करणे शक्य नसल्याचे राज्य सरकारने नमूद केले आहे.
बातम्या आणखी आहेत...