आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ कर्जाचे ओझे लादू नका कृषी उत्पादनाला योग्य भाव द्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नुकतेच २०१७-१८ या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला; परंतु यात कृषी क्षेत्रासाठी अल्प तरतूद असल्याने विविध संघटनांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली. शेतकरी संघटनांच्या मते यंदाच्या अर्थसंकल्पात कृषीसाठी काहीही विशेष देण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सरकारने १० लाख कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे, पण याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होणार आहे.  
 
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करणे अत्यावश्यक आहे. तसेच उत्पादित मालाला योग्य भाव मिळणेही तितकेच गरजेचे आहे. परंतु यासंदर्भात सरकारने घोषणा केलेली नाही. भारतीय शेतकरी युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकेत म्हणाले की, शेतकऱ्यांना पिकवलेल्या मालाला योग्य किंमत मिळावी यासाठी ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. देशात शेतकरी आत्महत्या वाढल्या असताना पीडित कुटुंबांना दिलासा देणारी योजना घोषित झालेली नाही. 

भारत-इंडियामधील गॅप वाढला  
खासदार आणि स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की, नोटबंदीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात काहीही केले नाही. अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधानांनी ६० दिवसांची कर्जमाफीची जी घोषणा केली तिचा जास्त काही फायदा झाला नाही. इंडिया आणि भारत हा गॅप वाढला आहे. पिकांचे दर घटले की शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही.   
बातम्या आणखी आहेत...