आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक समिट : ब्रिटिश पीएम म्हणाल्या, भारतीय उद्योजकांसाठी फायद्याची अशी यंत्रणा तयार करू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या आहेत. मे यांच्याबरोबर 40 उद्योजकांचे शिष्टमंडळही भारतात आलेले आहे. सोमवारी मे टेक समिटमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, भारतीय गुंतवणूकदार ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आम्ही अशी यंत्रणा तयार करत आहोत, जी भारतीय व्यावसायिकांना फायदेशीर ठरेल. नरेंद्र मोदी म्हणाले, ब्रिटनचे भारताशी जुने नाते आहे. भारत ब्रिटनमध्ये तिसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. दोन्ही देश मिळून आव्हानांचा सामना करूया. मोदी आणि मे यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

थेरेसा भारतात येणे अभिमानास्पद..
- मोदी म्हणाले की, थेरेसांचे भारतात स्वागत आहे. त्यांनी याठिकाणी येणे म्हणजे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.
- त्यांनी युरोपियन युनियन बाहेरच्या दौऱ्यासाठी सर्वप्रथम भारताची निवड केली आहे. ही खरंच गौरवास्पद बाब आहे.
- भारत ब्रिटनमध्ये तिसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे. तसेच भारतही आता इनव्हेस्टमेंट आणि बिझनेसबाबत खुले धोरण स्वीकारत असल्याचे मोदी म्हणाले.
- माझ्या मते सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे भारत आणि ब्रिटनमधील नाते अधिक घट्ट होण्यासाठी मदत करतील.
- हेल्थकेअर, एनर्जी आणि टेक्नोलॉजी हे काही असे सेक्टर आहेत, जे भारत-ब्रिटनदरम्यान व्यवसायाला चालना देतील.
- आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत आणि यूकेने एकत्रितपणे संशोधन करणे गरजेचे आहे.
- दोन्ही देश क्लीन एनर्जीसाठी एक आर अँड डी सेंटर निर्माण करण्यास तयार आहेत.
- मला वाटते की, मेक इन इंडिया प्रोजेक्ट दोन्ही देशांमधील नात्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभाऊ शकतो.

थेरेसा मे काय म्हणाल्या...
- मे म्हणाल्या.. ब्रिटन भारतासाठी रजिस्टर्ड ट्रॅव्हलर स्कीम लागू करेल. त्यामुळे भारतीय व्यावसायिकांना ब्रिटनला येणे सोपे होईल.
- ब्रिटनमध्ये आम्ही इकॉनॉमिक आणि सोशल रिफॉर्म्सवर काम करत आहोत. भारतीय गुंतवणूक ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरत आहे.
- भारत आणि ब्रिटनचे नाते घट्ट आहे.
पुढे वाचा कोणत्या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्षे तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्षे तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...