आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिहार तुरुंगामध्ये पोहोचताच शहाबुद्दीनला फुटला घाम, सीसीटीव्ही कॅमेरे लावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - सिवानमध्ये पत्रकार राजदेव रंजन यांची गोळी घालून हत्या करण्यासह जवळपास ५० प्रकरणांतील आरोपी मोहंमद शहाबुद्दीन तिहार तुरुंगात पोहोचला आणि त्याला अक्षरश: घाम फुटला. त्यांच्या चेहऱ्यावरील ऐट गायब झाली होती. सिवान येथून पाटणा रेल्वे स्थानक आणि संपर्क क्रांती एक्स्प्रेसपासून सकाळी आठ वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरही त्याचे समर्थक घोषणा देत होते, पण तिहार तुरुंगात पोहोचताच शहाबुद्दीनच्या चेहऱ्यावरील रंग उडाले.

 तिहारमध्ये पोहोचताच शहाबुद्दीनने पाण्याचे अनेक ग्लास रिचवले, अशी माहिती एका तुरुंग अधिकाऱ्याने दिली.  सर्वोच्च न्यायालयाने शहाबुद्दीनला सर्वसामान्य कैद्यांप्रमाणे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्याच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याच्या जवळच्या कैद्यांचेही प्रोफायलिंग करण्याबरोबरच त्यांच्यावरही लक्ष ठेवण्यात येत आहे.  

पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी... 

बातम्या आणखी आहेत...