आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रेल्वे गाड्यांचे 17 मुद्द्यांवर रँकिंग, अधिकाऱ्यांच्या बढतीचा संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - रेल्वे सेवांत सुधारणा आणि व्यावसायिक आघाडीवर सुधारणा करण्यासाठी मंत्रालय तीन पावले उचलत आहे. त्यानुसार प्रत्येक रेल्वेगाडीचे रँकिंग होईल. १७ मुद्द्यांवर सर्व विभागांचेही रँकिंग होईल. अधिकाऱ्यांच्या बढतीचा संबंध या रँकिंगशी जोडला जाईल.
 
रेल्वेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वेगाड्यांचे रँकिंग आधी एकदा सुरू झाले होते, पण ती प्रक्रिया जास्त काळ चालली नाही. आता देशभर ती पुन्हा सुरू केली जात आहे. दिल्ली विभागापासून त्याचा प्रारंभ होत आहे. आता बाहेरील संस्था प्रवाशांचा फीडबॅक घेईल. आतापर्यंत स्वच्छता आणि केटरिंगचे कर्मचारीच फीडबॅक फॉर्म भरतात. 
 
ही दोन्ही कामे कंत्राटदारांकडे आहेत. त्यामुळे हेराफेरीची शंका असते. वाईट फीडबॅक असलेला फॉर्म हे लोक लपवतात, असा संशय आहे. संबंधित संस्था नंतरही प्रवाशांना दूरध्वनी करून फीडबॅकला दुजोरा घेईल. 
 
 दुसरा महत्त्वाचा बदल केटरिंग आणि स्वच्छता धोरणात होईल. आतापर्यंत एका निश्चित रकमेपर्यंतचा व्यवसाय करणाऱ्यांना कंत्राट मिळते. त्यामुळे मर्यादित कंपन्याच कामे करतात. कंत्राट रद्द झाल्यानंतर कंत्राट प्रक्रिया पुन्हा सुरू होते. त्याला वेळ लागत असल्याने प्रवासी त्रस्त होतात. 
 
आता कंत्राट रद्द झाल्यास त्याच दराने दुसऱ्या क्रमांकावरील पार्टीला कंत्राट मिळेल. त्याचबरोबर हॉटेल, मोठ्या पार्ट्या आयोजित करणाऱ्यांनाही केटरिंगचे कंत्राट मिळेल. स्वच्छतेचे कंत्राटही रेल्वेगाड्यांऐवजी स्थानकाच्या हिशेबाने देण्यावर विचार सुरू आहे. त्यामुळे स्थानकात एक किंवा दोन कंत्राटदार असतील. तेच सर्व रेल्वेगाड्या आणि स्थानकांच्या स्वच्छतेसाठी जबाबदार असतील.  
 
तिसरे पाऊल म्हणजे सर्व रेल्वे झोनचे १७ मुद्द्यांवर रँकिंग होईल. मालवाहतुकीचे उद्दिष्ट, स्वच्छता, परिचालन, ग्राहकांचे समाधान यासारखे मुद्दे त्यात समाविष्ट असतील. हे रँकिंग अधिकाऱ्यांच्या सीआरशी जोडले जाईल. त्याच्या आधारेच बढती मिळेल. पहिल्या टप्प्यात दक्षिणेकडील राज्यातील झोन आघाडीवर आहेत. उत्तर रेल्वे १३ व्या स्थानी आहे.
बातम्या आणखी आहेत...