आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रिपल तलाकवर हिवाळी अधिवेशनात विधेयक; केंद्र सरकार डिसेंबरमध्ये बोलावणार अधिवेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ट्रिपल तलाकवर बंदी अाणण्यासाठी केंद्र सरकार संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्यावर विचार करत आहे. सरकारी सूत्रांनी मंगळवारी याबाबत संकेत दिले. नव्या कायद्याचा आराखडा तयार करण्यासाठी केंद्राने मंत्रिमंडळ समितीची स्थापना केली आहे. तीन तलाकवर बंदीसाठी नव्या विधेयकाचे प्रारूप तयार करणे वा सध्याच्या कायद्यात आवश्यक दुरुस्तीसाठी सल्ले देण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टाने एकाच वेळी तीन तलाकवर बंदी आणत सरकारला याबाबत नवा कायदा करण्याचा सल्ला दिला होता. 


तलाक-ए-बिद्दतपासून मुस्लिम महिलांच्या सुटकेसाठी सरकार हा कायदा करणार असल्याचे सांगितले जाते. ठोस कायद्याअभावी मुस्लिम पती हे पत्नीला तीन तलाक देतात.


हिवाळी अधिवेशन 
संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार म्हणाले की, सरकार डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन बोलावणार आहे. हिवाळी अधिवेशन टाळण्याचा अारोप फेटाळत अनंतकुमार म्हणाले की, यूपीए सरकारने २००८ आणि २०१३ मध्ये हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये बोलावले होेते. 

बातम्या आणखी आहेत...