आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळींचा हमी भाव वाढवा : समिती, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांची शिफारस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील डाळींची कमतरता भरून निघण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या धान्याचा योग्य भाव मिळावा यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या समितीने ट्रेडर्सवर घालण्यात आलेली साठा मर्यादा रद्द करण्याची तसेच हरभरा-उडीद यासारख्या डाळींची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवण्याची शिफारस केली आहे. समितीचे अध्यक्ष मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी समितीच्या शिफारशी अर्थ मंत्रालयाकडे सुपूर्द केल्या आहेत.

देशात अनेक वर्षांपासून डाळींची कमतरता भासत आहे. यंदा चांगले प्रयत्न झाल्यामुळे देशातील शेतकरी कडधान्य उत्पादनाकडे वळला आहे. त्यामुळे देशातील डाळींची कमतरता मोठ्या प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा नगदी पिकांकडे वळू नये साठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळेच कडधान्याबाबत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या किमान हमी दरात वाढ करण्याची शिफारस सुब्रमणियन यांच्या समितीने केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सरळ फायदा होऊन दलाल आणि ट्रेडर्सची मनमानी कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे समितीने म्हटले आहे. देशात कमीत कमी २० लाख टन भांडाराची क्षमता विकसित करावी लागणार असल्याचेही समितीने सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...