आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉन छोटा राजनसाठी तिहार कारागृहातील सुरक्षा वाढवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजनला गुरुवारी कडक बंदोबस्तात तिहार कारागृहात आणण्यात आले होते.
नवी दिल्ली- दिल्लीच्या न्यायालयाने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी तिहार कारागृहात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहात त्याच्याभोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सीबीआयने ५५ वर्षीय डॉन छोटा राजनला २५ ऑक्टोबरला इंडोनेशियात बाली येथे अटक केली होती. त्यानंतर त्याला तेथून भारतात आणण्यात आले होते. राजनच्या विरोधात इतर प्रकरणांत फायली मिळालेल्या नाहीत. सीबीआय महाराष्ट्र पोलिसांच्या संपर्कात असून राजनच्या विरोधात दाखल ७१ प्रकरणांच्या फायली ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सीबीआयच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. पोलिसांनी राजनच्या विरोधात हत्येप्रकरणी २० गुन्हेही दाखल केलेले आहेत. दरम्यान राजनच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन तुरुंग प्रशासन राजनवर प्रत्येक क्षणी निगराणी ठेवणार आहे. तुरुंग व्यवस्थापनाने राजनसाठी १० सुरक्षारक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षकांचे पथक तैनात केले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.