आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्सल बंधूंविरोधी याचिका फेटाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उपहार सिनेमागृह जळीतकांड प्रकरणात पीडितांच्या संघटनेने धमकी दिल्यावरून अन्सल बंधूंना नोटीस पाठवण्याची केलेली विनंती शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. अगोदर दिल्ली उच्च न्यायालयानेदेखील ही याचिका फेटाळली होती. संघटनेच्या अध्यक्ष नीलम कृष्णमूर्ती यांनी केलेल्या याचिकेत सुशील आणि गोपाळ अन्सल यांच्यावर धमकी देणे आणि अपशब्दांचा वापर करण्याचा आरोप ठेवला आहे.
या प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला कृष्णमूर्ती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात सुनावणीस परवानगी दिली होती.
कृष्णमूर्ती यांनी जळीतकांडात पोटच्या दोन मुलांना गमावले होते.