आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरभद्र सिंह यांच्याविरुद्ध "ईडी'चा खटला दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या अडचणींत भर पडू शकते. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सप्टेंबरमध्ये सीबीआयने फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत ईडीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्टनुसार(पीएमएलए) कारवाई केली आहे.

चौकशीदरम्यान काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सापडली आहेत. त्यात सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पैशाच्या देवाण-घेवाणीचा बेकायदा व्यवहार आणि तो मार्गी लावण्यासंबंधीच्या आरोपाची माहिती मिळाली आहे. ईडीचे चौकशी पथक यासंदर्भात सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांची लवकर चौकशी करू शकते. २००९ ते २०११ दरम्यान केंद्रीय पोलाद मंत्री असताना ६.१ कोटी रुपये स्वत:च्या आणि नातेवाइकांच्या नावावर एलआयसी पॉलिसी घेतल्याचा सिंह यांच्यावर आरोप आहे. या पैशासाठी शेतीच्या उत्पन्नाचा स्रोत दाखवण्यात आला आहे. सिंह यांनी कथितरीत्या काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी २०१२ मध्ये आयकर परतावा नव्याने दाखल केला होता. सीबीआयला यावर संशय आहे. सीबीआयने सिंह, त्यांची पत्नी प्रतिभा सिंह, एलआयसी एजंट आनंद चौहान आणि त्यंाचा भाऊ सी. एल. चौहान यांनाही आरोपी केले आहे.