आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लिव्ह इन’मध्ये व्हिसाचा अवधी वाढवून द्यावा का, उच्च न्यायालयाची विचारणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लिव्ह इन रिलेशनमध्ये असणाऱ्या परदेशी नागरिकांच्या व्हिसाचा अवधी वाढवून द्यावा का, याविषयी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे विचारणा केली आहे. या सुविधेसाठी असे नागरिक पात्र धरण्यात यावेत का, यासंबंधी केंद्राने ३ महिन्यांत स्पष्टीकरण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. भारतीय नागरिकाशी विवाह केलेल्या परदेशी नागरिकांना अशी सुविधा मिळते.

उज्बेकिस्तानच्या महिलेने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्राकडून यावर खुलासा मागवला आहे. आपली दोन मुले व स्वत:लाही व्हिसा अवधी वाढवून मिळावा, अशी मागणी तिने केली आहे. भारतीय लिव्ह इन जोडीदारासोबत ती भारतातच राहू इच्छिते. या याचिकेवर न्यायाधीश राजीव सहाय यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायद्याने पत्नी व लिव्ह इनमध्ये राहणारी महिला यांना समान निकष लागू केले आहेत. त्याचप्रमाणे भारतीयांसोबत राहणाऱ्या लिव्ह इन परदेशी जोडीदारालाही व्हिसाच्या सुविधा दिल्या जाव्यात, असे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले. भारतीयाशी विवाह केल्यावर त्याच सुविधा लिव्ह इनलाही मिळाव्यात.
बातम्या आणखी आहेत...