आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत मद्यपानाचे वय २१ वर येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीत दारू पिण्याचा परवाना देण्याचे वय २५ वरून २१ वर्षे करण्याबाबत प्रस्ताव आल्यास सरकार त्यावर सकारात्मक विचार करेल, असे संकेत आप सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी दिले आहेत. जर सर्वसामान्य नागरिक, रेस्टॉरंट मालक व पर्यटन इंडस्ट्रीकडून तशी मागणी केल्यास सरकार त्यावर विचार करू शकते, असे शिसोदिया यांनी म्हटले आहे. दारू पिणे किंवा न पिणे ही वैयक्तिक बाब आहे. याआधी जूनमध्ये सीमा शुल्क विभागाने प्रस्ताव सादर केला होता; परंतु दिल्ली सरकारने तो खारीज केला होता. मात्र, रेस्टॉरंट मालकांच्या एका बैठकीत पर्यटनमंत्री कपिल मिश्रा यांनी दारू पिण्याचे वय २५ वरून कमी करून २१ करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर भाजपने टीका केली होती.